बातम्यामहाराष्ट्र

ज्यांनी कार्यकर्त्यांना दुकानदाराकडून हप्ते वसूल करणे शिकवले तेच गुन्हेगारी नष्ट करण्यावर बोलतात-दत्ताकाका साने

पिंपरी(वास्तव संघर्ष) – मोशी, चिखली परिसरात असलेल्या बेकायदेशीर दारू दुकाने, मटका अड्ड्यांवर कठोर कारवाई होणार आहे. तसेच ज्या दुकानांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ज्या दुकानांच्या आसपासच्या परिसरात महिला छेडछाडीचे प्रकार घडत आहेत, अशा दुकानांवर देखील पोलीस लक्ष ठेवणार आहेत. असा विश्वास पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी मुक्त संवाद या कार्यक्रमात बोलत होते. आमदार महेश लांडगे आणि चिखली, मोशी हाऊसिंग फेडरेशन यांच्या वतीने नागरिक आणि पोलीस संवादाचे आयोजन करण्यात आले होते.

माञ हा मुक्त संवादावर माजी विरोधी पक्षनेते दत्ता काका साने यांनी टिका केली आहे. पञकार परिषदेत दत्ता काका साने म्हणाले, ज्यांनी आपले कार्यकर्ते गोरगरीब दुकानदारांपासून मोठ्या ठेकेदारांकडून हप्ते घेत फिरवले आणि जगवले. त्यांनी गुन्हेगारी नष्ट करण्यावर बोलावे, हे म्हणजे उंदराला मांजर साक्ष असल्यासारखे झाले. निवडणुका जवळ आल्या म्हणून स्व:ताची गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवत शांतिदूताचा अवतार घेत फिरणाऱ्या आमदारांनी कितीही झाकल तरी त्यांची कर्म लपणार नाहीत.

येणाऱ्या निवडणुकीत आमदाराला पराभूत करुन भोसरीतील नागरिकांना दहशतमुक्त करणार आहोत. गेल्या वर्षभरात शहरात १२००० च्यावर गुन्हे घडले. ६९ खून, ८३ खुनाचे प्रयत्न, ३२ दरोडे, ३५५ जबरी चोरी, ११८ बलात्कार, ४६९ विनयभंग एवढे गुन्हे घडले. सरासरी महिन्याला ६ खून या शहरात घडले. एमआयडीसीतील भागात धमकवण्याचे प्रकार रोज सुरू आहेत.

शहराच्या कायदा सुव्यवस्थचे तीन तेरा वाजले आहेत. या सगळ्याची जबाबदारी घेऊन कडक योजना करण्याचे सोडून पोलीस आयुक्त आपली निष्क्रियता लपवत संवादाचे कार्यक्रम घेत आहेत. उमेदवारांचा प्रचार करत फिरत आहेत.पोलीस आयुक्तांचा मुक्त संवाद म्हणजे चुकांवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न आहे. या कृतीचा शहरातील नागरिक निषेधच करतील. आयुक्तांनी प्रचार करण्याचे सोडून आपल्या कामावर लक्ष द्यावे, असे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे

Share this: