क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

बायकोशी शारिरीक संबंध ठेवण्यास नव-याचा नकार ; कारण वाचून बसेल धक्का

पिंपरी (वास्तव संघर्ष) : लग्न झाल्याच्या दुसर्‍या दिवसापासून पतीने विवाहितेला शारिरीक व मानसिक ञास दिला तसेच पत्नीशी शारिरीक संबंध ठेवण्यास विरोध करून नांदवण्यास नकार देण्यात आला. ही घटना 16 मे 2021 पासून 22 डिसेंबर 2021 दरम्यान सुखवानी लॉन्स , डी-2 अजमेरा मेनरोड पिंपरी येथे घडली आहे.

पिडीत विवाहीत महिलेने याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पती-हनुमंत भिकाजी हिंगे( वय-41, रा. सुखवानी लॉन्स , डी-2अजमेरा पिंपरी, महीला आरोपी ( सासु ) वय-55 रा. मेनरोड पिंपरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पिडीत महिलेचे आरोपी हनुमंत याच्याशी जीवनसाथी डॉटकॉम या साईटवर त्याच्या पसंतीने व घरच्यांच्या संमतीने दि. 15 मे 2021 रोजी लग्न झाले होते. लग्न झालेल्या दुसऱ्या दिवसापासून फिर्यादी महिलेच्या पतीने बाहेर एका ऑफिस मधील मुली सोबत अफेयर असल्याने फिर्यादी यांच्या पतीने फिर्यादी यांच्या बरोबर पती पत्नीचे वैवाहिक तसेच शारीरीक संबंध ठेवले नाही व फिर्यादी यांना पत्नीचा कोणताही दर्जा दिला नसुन तसेच सासुने फिर्यादी महिलेला ‘तुला स्वयंपाक निट करता येत नाही’ असे म्हणत मानसिक छळ केला आहे . फिर्यादी महिलेचा पती त्यांना नांदवत नसुन त्याने व फिर्यादी यांच्या सासुने फिर्यादीस मानसिक व शारीररीक छळ केला आहे. असे फिर्यादीत महिलेने म्हटले आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Share this: