बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांचे नगरसेवक पद कायम ;उच्च न्यायालयाचा आदेश 

पिंपरी (वास्तव संघर्ष) :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेविका डॉ . सुलक्षणा शिलवंत – धर यांचे पद रद्द करण्याबाबत विभागीय आयुक्तांनी नोंदवलेला निष्कर्ष मंगळवारी ( दि. 21 डिसेंबर) मुंबई  मा. उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. असा आदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जी. एस. कुलकर्णी यांनी दिला असल्याची माहिती नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

पिंपरी मनपा मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका वैशाली घोडेकर, संगीता ताम्हाणे उपस्थित होते.
यावेळी शिलवंत यांनी सांगितले की,कोरोना काळात पिंपरी – चिंचवड महापालिकेला १० लाखांचे मास्क पुरविणा-या एडिसन लाईफ सायन्स कंपनीशी थेट संबंध असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांचे नगरसेवक पद रद्द करावे , अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी केली होती .

या प्रकरणात विभागीय आयुक्त कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली . चौकशीअंती निष्कर्ष नोंदवला होता . सुलक्षणा शिलवत धर  या महापालिका सदस्य म्हणून पदावर राहण्यास अनर्ह आहेत . त्यांना अपात्र करावे असा स्पष्ट निष्कर्ष विभागीय आयुक्त यांनी दिला होता . मात्र , पद रद्द करण्याबाबत कोणताही आदेश अद्याप महापालिका प्रशासनाला प्राप्त झाला नव्हता . त्यामुळे सुलक्षणा शिलवंत धर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते .

दरम्यान ,6 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात माननीय उच्च न्यायाधीश जी. एस. कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी झाली होती . त्यानंतर पुन्हा 21 डिसेंबर रोजी पुन्हा सुनावणी घेण्यात आली . या सुनावणीमध्ये तक्रारकर्त्यांच्या वकिलांनी हे मान्य केले की विभागीय आयुक्तांनी दिलेला चुकीचा आदेश अधिकार क्षेत्र आणि अधिकाराशिवाय होता या प्रकरणात नगरसेवक पद रद्द करण्याबाबत विभागीय आयुक्तांना अधिकार नाहीत , असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला . त्यामुळे सुलक्षणा शिलवंत – धर यांचे पद कायम राहिले आहे . वास्तविक पाहता एडिसन लाइफ सायन्स या माझ्या भावाच्या कंपनीने वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून देखील महापालिकेशी कोणत्याही प्रकारचा व्यवहार केलेला नव्हता व तो जाणीवपूर्वक टाळला होता .

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्वत्र लॉकडाऊन असताना कुठेही मास्क उपलब्ध होत नव्हते त्यामुळे महापालिका आयुक्तांनी केलेल्या विनंतीवरून व त्यांनी ठरवून दिलेल्या दरानुसार चांगल्या प्रतीचे मास्क माझ्या भावाच्या कंपनीने पुरवले होते . त्या कंपनीची वास्तविक पाहता माझा कोणताही संबंध नसताना बॅलन्स शीट दाखवून मला या प्रकरणात गोवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात कारस्थान करून जुन्या आला . ही सत्य परिस्थिती माननीय महापालिका आयुक्तांनी माननीय विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून देऊन देखील अशा प्रकारचा निष्कर्ष विभागीय आयुक्तांनी का नोंदवला असा प्रश्न सुलक्षणा शिलवंत धर यांनी उपस्थित केला.

Share this: