बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित मुलीच्या अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ पिंपरीत कॅन्डल मार्च

पिंपरी (वास्तव संघर्ष) :उत्तर प्रदेशातील हाथरस येथील अवघ्या 19 वर्षांच्या दलित वाल्मिकी समाजातील मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आज गुरुवार दि. 1 ओक्टबर रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान पिंपरीतील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पिंपरी चिंचवड शहर वाल्मीकी समाजातर्फे कॅन्डल मार्च पदयात्रा काढण्यात आली.

यावेळी शिवसेना युवा नेते दिपक कांबळे, राम अवतार ढकोलिया,सुशील वाल्मिकी, पिंपरी चिंचवड शहर वाल्मीकी अध्यक्ष राजू परदेशी,ग्यानचंद बेद, कुणाल बेद, रोहिदास कुडीया ,सोमनाथ बेद मोहन बीडलांन,मोहन बेद ,धारा अडालीय,पवन डीग्या, अनिल पारचा ,कृष्णा चंडालिया,मनोज करोतीया,विशाल वाल्मिकी,कुमार सोनकांबळे, किसन चावरीयाराष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार सेलचे महाराष्ट्राचे सचिव युनुसभाई पठाण व पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष चंद्रकांत बोचकुरे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार सेल पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष शिवा कांबळे हे उपस्थित होते.

हाथरस येथील पीडित दलित मुलीच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या गुन्हेगारांना कठोर फाशीची शिक्षा करा ; पीडित मुलीला न्याय देण्यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे; पीडित मुलीच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेश सरकार ने आर्थिक मदत द्यावी बहन मनीषा वाल्मिकी यांच्या पीडित कुटुंबास पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.

Share this: