बातम्यामहाराष्ट्र

संत सेवालाल महाराजांची शिकवण सकल मानव जातीसाठी- एम.टी. जाधव सर.


नांदेड (प्रतिनिधी) संत सेवालाल महाराज जयंती उत्सव नांदेडमधील माधवपुष्प निवासी संस्कार केंद्र येथे शनिवार दिनांक १५ फ्रेब्रुवारी साजरी करण्यात आला, यावेळी एम जाधव म्हणाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते म्हणाले, संतांचे कार्य हे समाज उद्धारासाठी असते. कोणतेही संत महत्मIयाला एका विशिष्ट जातीधर्मामध्ये संकुचित करून ठेवणे योग्य नाही.

सेवालाल महाराजांची अध्यात्मीक व वैचारिक शिकवण ही सदैव प्रेरणादायी असेल, ती विद्यार्थ्यानी अंगीकारावी व आपल्या आई वडीलांच्या कष्टांना डोळयासमोर ठेवून अभ्यासातून प्रगती साधावी. असे विचार त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन माधवपुष्प निवासी संस्कार केंद्राने केले होते.

यावेळी कॉक्ट्राक्टर धिरज च०हाण, इंजी. शिवराज पाटील, प्रदिप जाधव. संस्कार केंद्राचे निवासी शिक्षक कपिल सर , अविनाश बोपिलवार , गच्चे सर गवते सर . शिंदेसर, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पुर्णतः गोरमाटी (लमानी) भाषेमध्ये हॉस्टेलचा विद्यार्थी नितीन राठोड याने केले. तर आभार प्रदर्शन माधवपुष्पनिवासी संस्कार केंद्राचे संचालक श्याम जाधव यानी केले.

Share this: