महिलेला दमबाजी केल्याप्रकरणी अभियंता शिरीष पोरेडी यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड महापालिकेतील प्रशासकीय कार्यकारी अभियंता यांनी सामाजिक कार्यकर्तीना दमबाजी करत अश्लील शिवीगाळ केली आहे.
याप्रकरणी संगिता परेश शहा (वय ३६ रा. वाकड पुणे ) यांनी मंगळवारी (दि.२७) संत तुकारामनगर पोलिस चौकीत फिर्याद दिली असून कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी (वय 40 रा. ) याच्यावर महिलेला अर्वाच्य भाषेत दम दिल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, पालिकेचे प्रशासकीय कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी यांना फिर्यादीने गोपी वाधवाणी यांचे पिंपरीतील अनधिकृत बांधकाम पाडावे यासंदर्भात पञ दिले होते त्यानंतर ६/२/२०१८ रोजी पालिकेने अनधिकृत बांधकाम पाडावे अशी नोटीस बजावली होती. मात्र तरीदेखील ते अनधिकृत बांधकाम पाडत नसल्याने पोरेडी यांना विचारले असता त्यांनी फिर्यादी महिलेला अर्वाच्य भाषेत दम दिला .
आमच्या प्रतिनिधींनी यासंदर्भात अभियंता शिरीष पोरेडी यांना विचारले असता ते म्हणाले संबंधीत अनधिकृत बांधकामाला आम्ही नोटीस आणि मालक गोपी वाधवाणी यांच्यावर पोलीस एफआयआर(FIR) केला असून तरी त्याच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल माञ महिलेला मी शिवीगाळ केली नाही असेही ते म्हणाले. परंतू पालिकेने अनधिकृत बांधकामांवर आणि गोपी वाधवाणी यांच्यावर कुठलीही पोलिस एफआयआर(FIR ) नोंदविली नाही अशी माहीती देखील समोर येत आहे.