बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

भाजपने स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांना राजीनामा द्यायला सांगावे – डॉ. निलम गो-हे

पिंपरी (वास्तव संघर्ष) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ निलम गो – हे यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस भेट दिली . महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी त्यांचे स्वागत केले .त्यानंतर त्यांनी पञकार परिषद घेऊन भाजपवर हल्लाबोल केला त्या म्हणाल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, त्यांचे सहकारी भ्रष्टाचाराविरोधात बोलत असतात. मात्र पिंपरी-चिंचवड पालिकेतील स्थायी समिती अध्यक्षांना लाच घेतल्याप्रकरणात ‘एसीबी’ने अटक केली. याबाबत भाजपने योग्य भूमिका घेऊन स्थायी समिती अध्यक्षांना राजीनामा द्यायला सांगायला पाहिजे.

गोऱ्हे यांनी आज (सोमवारी) पिंपरी-चिंचवड महापालिकेत येऊन राज्य सरकारच्या योजना, कोरोना काळातील सरकारने केलेल्या मदतीचे वाटप झाले आहे का, कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहरप्रमुख सचिन भोसले, सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर उपस्थित होते

तसेच कोरोना कालावधीत शासनाने जाहीर केलेल्या माथाडी कामगार , बांधकाम कामगार , घरेलू कामगार , रिक्षा चालक , एकल महिला , निराधार मुले यांचेकरीता असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत महापालिकेने केलेल्या कामकाजाचा देखील त्यांनी आढावा घेतला . महानगरपालिकेने कोरोना काळात केलेल्या कामगिरीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले .

Share this: