जय श्रीराम म्हणण्याची जबरदस्ती करणाऱ्यांना चोप देऊन गाढवावरुन धिंड काढणार – भीमआर्मी
मुंबई (वास्तव संघर्ष) दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आणि समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असलेल्या समाजकंटकांना चोप देण्याची चेतावणी भिमआर्मिने दिली आहे. औरंगाबाद या ठिकाणी काल एक मुस्लिम तरूण आपल्या घरी सायकलने जात असताना त्यांला जयश्रीराम बोलण्याची सक्ती करत काही समाजकंटकांनी बेदम मारहाण केली होती.
भारतात लोकशाही जिवंत आहे या भारत देशात सर्व जातीधर्मातील लोक राहतात संविधानात सर्वाना धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे तरी देखील काही समाजकंटक अल्पसंख्याक नागरिकांना ञास देत ‘जय श्रीराम’ म्हणण्याची सक्ती करत त्यांना मारहाण करत आहेत. त्यावरून काही लोकांचा जीव घेण्यात आला असे भीम आर्मी एकता मिशनचे प्रदेश प्रमुख अशोक कांबळे म्हणाले.
त्यामुळे जर आता यापुढे जय श्रीराम म्हणण्याची जबरदस्ती करणाऱ्यांना चोप देऊन तोंड काळे करून गाढवावरुन धिंड काढण्यात येईल आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.