नाहीतर एका एकाला खल्लास करेल ‘असे म्हणून परिसरातील नागरिकांना धमकी
चिखली (वास्तव संघर्ष): तीन जणांच्या टोळक्याने नागरिकांना शिवीगाळ व लाथा बुक्क्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन कोयत्याने जखमी केली आहे. ही घटना शनिवारी (दि.22) करवीर बस स्टॉपजवळ रुपीनगर चिखली येथे घडली आहे.
सचिन मोरे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शुभम कदम (वय 21,रा.माऊली हौसिंग सोसायटी , रुपीनगर तळवडे) व त्याचे दोन मित्र (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम व त्यांच्या दोन मित्रांनी तळवडे रोडवरील करवीर बस स्टॉप येथे व जवळच असलेल्या फिर्यादी सचिन हे असताना त्यांच्या दुकानात असताना आरोपींनी आपापसात जोरदार भांडणे करून दहशत माजवून वाईट शिवीगाळ करून फिर्यादी व नागरिकांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादी यांच्या गाडीची पुढील बाजूची काच फोडून नुकसान केले. फिर्यादी यांना आरोपी शुभम याने कोयता मारून नाकावर तसेच उजव्या हातावर जबर दुखापत केली व सोडवायला येणाऱ्या नागरिकांना लाथा बुक्क्यांनी जोरदार मारहाण केली.आम्ही इथले भाई आहोत,आमच्यामध्ये यायचे नाही.नाहीतर एका एकाला खल्लास करेल ‘असे म्हणून धमकी दिली. अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.