बातम्यामहाराष्ट्र

एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी ‘जय भीम’ म्हणत घेतली खासदारकीची शपथ

वास्तव संघर्ष आॅनलाईन :ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लमीन (एमआयएम) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी उर्दू भाषेत आज खासदारकीची शपथ घेतली.यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी जय भीम म्हणत शपथेचा शेवट केला. असदुद्दीन ओवेसी शपथ घेण्यासाठी जात असताना सत्ताधाऱ्यांनी ‘भारत माता की जय’ अश’ घोणषाबाजीदेखील केली. अकबरुद्दीन ओवेसींचा हैदराबादमधील चंद्रायन गुट्टा मतदारसंघातून विजय झाला आहे.

सोमवारपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून हे पहिलंच अधिवेशन आहे. लोकसभेत निवडणूक आलेल्या खासदारांचा शपथविधी सोमवारी पार पडला होता. आज एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी शपथ घेण्यासाठी उभे राहिले असता ‘भारत माता की जय’ अशी घोषणाबाजी होण्यास सुरुवात झाली. यावेळी ओवेसी यांनीदेखील अजून जोरात घोषणा द्या असं म्हणत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.

लोकसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी हातमिळवणी केली होती. भाजपाच्या विरोधात समविचारी पक्षांची महाआघाडी स्थापन करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असतानाच प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम (ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लीमन) यांनी निवडणुका एकत्र लढण्याचे जाहीर केले होते. मात्र राज्यात त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही.

याआधी सोमवारी भोपाळमधून भाजपाच्या खासदार असणाऱ्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी खासदारकीची शपथ घेतली. मात्र यावेळी विरोधकांचा जोरदार गोंधळ पहायला मिळाला होता. साध्वी प्रज्ञा सिंह शपथ घेण्यासाठी दाखल होताच, विरोधकांनी त्यांच्या नावावर आक्षेप घेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. प्रज्ञा सिंह ठाकूर संस्कृत भाषेत शपथ घेत होत्या. मात्र त्यांनी आपल्या नावाचा उच्चार करताच विरोधकांनी विरोध करत फक्त आपल्या नावाचा उल्लेख व्हावा अशी मागणी केली

Share this: