बारामतीत गोपीचंद पडळकरांविरूध्द प्लेक्स ;आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल दिले जाहीर आमंत्रण
वास्तव संघर्ष आॅनलाईन(दिपक साबळे) :- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले असून बारामतीत माञ प्लेक्स वार पाहायला मिळत आहे . एरवी फक्त निवडणूक प्रचारात विरोधकांवर प्लेक्स पोस्टरद्वारे टिका टिपण्णी पाहायला मिळत होती माञ निकालानंतरही बारामतीमध्ये प्लेक्स लागल्याने विरोधकाला आमच्या विरोधात थांबायचे तर डिपॉझिट गुल होण्याची काळजी करूनच उभे रहा असा इशाराच दिलेला दिसून येतो
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या भाजपच्या गोपीनाथ पडळकर यांचा तब्बल १ लाख ६५ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. त्यानंतर आता पोस्टरबाजीला उधाण आले आहे. ‘आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल,’ अशा आशयाचे पोस्टर्स बारामतीमध्ये झळकले असून विरोधकाला हरण्याचे जाहीर निमंत्रण दिले आहे.
दरम्यान, वंचीत बहुजन आघाडी पक्षातर्फे लोकसभेच्या टिकिटावर पडळकर यांनी तब्बल तीन लाख मते मिळवली होती माञ विधानसभेत त्यांचे डिपॉझिट गुल झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी ढाण्या वाघ संबोधलेल्या भाजपच्या गोपीनाथ पडळकरांसह बारामतीतील सर्वच उमेदवारांचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला. तसंच त्यांच्यासमोरील सर्वच उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले होते. मात्र सदरील प्लेक्स हे गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आहेत की आणखी कोणाच्या विरोधात आहे हे माञ गुलदस्त्यातच आहे