माझ्या पतीच्या कार्यालयावर हल्ला करणारा सुञधार कधी पकडणार ;दत्ता सानेंच्या पत्नीचे पोलिसांना भावनिक आवाहन
विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्य़ालयावरील हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादीचा पोलिस आयुक्तालयावर मोर्चा
पिंपरी(वास्तव संघर्ष) चिखली येथील साने चौकामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या जनसंपर्क कार्य़ालयाची काही दिवसांपूर्वी गुंड प्रवृत्तीच्या टोळक्यांनी तोडफोड केली होती . या घटनेला पंधरा दिवस उलटले असून, हल्ला करणाऱ्या मुख्य सुत्रधाराला अटक न झाल्यामुळे प्रेमलोक पार्क येथील पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयावर राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्ये यांच्याकडून मंगळवारी (दि.18) दुपारी तीन वाजता मोर्चा काढण्यात आला..
यावेळी विरोधीपक्षनेते दत्ताकाका साने यांच्या पत्नी हर्षदा साने यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्या म्हणाल्या, जनसंपर्क कार्य़ालयावर गेली पंधरा दिवस झाले हल्ला झाला सतत निवेदन देऊन पण हल्यामागचा सुञधार अजून मोकाट आहे. लोकप्रतिनिधी जर पिंपरी-चिंचवडमध्ये सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचे काय? या हल्यांनंतर आमचे कुटुंब दहशतीखाली आहे असे म्हणत त्याना अश्रू अनावर झाले यावेळी त्यांनी पोलीस आयुक्त यांना भावनिक आवाहन करत माझ्या पतीच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्याला कधी पकडणार असे आवाहन पोलिसांना केले.
या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, माजी आमदार विलास लांडे, यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.(वास्तव संघर्ष)