बातम्या

कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना निवेदन

पिंपरी (वास्तव संघर्ष): कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत शहरातील इमारत व जमिनीवर मालमत्ता कराची आकारणी व वसूलीची कार्यवाही करणेत येते. या विभागाचा कार्यभार स्विकारलेनंतर हा विभाग नागरिकांशी थेट संबंध असणारा व महानगरपालिकेचा स्थायी स्वरुपाचे उत्पन्न मिळवून देणारा विभाग असल्याने नागरिकांना लोकाभिमुख जलद सेवा देऊन येणा-या सेवा पारदर्शी व गतिमान असणेचे दृष्टीने त्याच बरोबर महानगरपालिका उत्पन्नात वाढ करुन कामकाज करणे आवश्यक आहे.

सध्याचे युग आधुनिक स्वरुपाचे असून नागरिकांचा कल सोशल मिडिया तसेच ऑनलाईन सेवा यांचेकडे मोठ्या प्रमाणात आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांना मालमत्ता नोंदीसाठी “माझी मिळकत, माझी आकारणी ” या ऑनलाईन योजनेतील त्रुटी दूर करून सदर सेवा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली. त्याच बरोबर मालमत्ता हस्तांतरणासाठी होणारा विलंबातील त्रुटी विचारात घेऊन ऑनलाईन हस्तांतरण सुविधा सुरु केली.

मालमत्ता कर सवलत योजना, थकबाकी नसल्याचा दाखला यासाठी नागरिकांना प्रत्यक्ष कार्यालयात जाणे-येणे यामुळे श्रम व वेळेचा अपव्यय विचारात घेऊन सर्व सवलत योजना तसेच विनाशुल्क थकबाकी नसल्याचा दाखला ऑनलाईन सुविधाद्वारे देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच चालू वर्षात नवीन आकारणी होणा-या मालमत्ता कर सवलतीपासून वंचित रहाणे, दिव्यांगांना कर सवलतीचा लाभ घेणेची विशिष्ट कालमर्यादा यामध्ये नवीन धोरण अंमलात आणून या घटकांना कर सवलतीचा लाभ सुविधा सुरू केली आहे.

नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निवारण होणेकामी दरमहा कर संवाद आयोजन, मालमत्ता कर 24 X 7 हेल्पलाईन सुविधा, मालमत्तेच्या माहितीसाठी मोबाईल व मालमत्ता क्रमांक जोडणी, कर भरणेसाठी BBPS प्रणाली सुविधा यासारखे उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. पर्यावरण शैक्षणिक संस्था यांना सामान्य करात सवलत योजना या सारखे नावीन्यपूर्ण उपक्रम सुरु केले. उर्वरीत सेवा डिसेंबर अखेर ऑनलाईन करणेचाही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मानस आहे. पूरक सोसायटी,आपले कर भरण्यासाठी व इतर माहितीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या वेबसाईटचा वापर करा.

Share this: