बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील रिक्षा चालक मालक यांना हक्काचं घर आणि त्यांच्या समस्यांवर लक्ष घालणार-युवराज दाखले

पिंपरी : पिंपरीतील गोरगरीब रिक्षा चालकानां हक्काचं घर देण्याचं आश्वासन पिंपरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे
बंडखोर उमेदवार युवराज दाखले यांनी आज प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारादरम्यान केले.

यावेळी बोलताना दाखले म्हणाले पिंपरी विधानसभा मतदारसंघात एकुण एक लाख रिक्षा चालक आहेत त्यांच्या समस्या अनेक आहेत इतक्या वर्ष झाले काहींना घर नाही, त्यामुळे निवडणूक चिन्ह मी मुद्दाम अॅटो रिक्षा ही निशानी घेतली आहे कारण शहरात जनसामान्यांमधील रिक्षा चालकाचे दुख: माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्या शिवाय कुणी ओळखू शकत नाही काही वर्षे मी रिक्षा चालवला आहे.

दरम्यान आज शेवटच्या प्रचारा दरम्यान अपक्ष उमेदवार युवराज दाखले यांनी रिक्षा चालक मालक यांच्या गाठी भेटी घेतल्या त्यावेळेस त्यांना भरघोस मतदान करून निवडून आणण्याचे आश्वासन चालक मालक यांनी दिलं

Share this: