पिंपरी चिंचवडमधील शाळा, कोचिंग क्लासेस आणि ग्रंथालय होणार सुरू
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामधील शासकीय शाळा इयत्ता 5 वी ते 8 वी चे वर्ग येत्या दिनांक 4 फ्रेबुवारी २०२१ पासुन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली आज झालेल्या पञकार परिषदेत महापौर सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके उपस्थित होते. याचबरोबर कोचिंग क्लासेस, सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय यांना देखील परवानगी देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली .
शाळा सुरु करण्यापुर्वी व शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य , स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सुचनांचे आदेशाचे पालन करण्याचे आवाहन देखील महापौर यांनी केले आहे .तसेच शाळा महाविद्यालयामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची कोरोना चाचणी होणे आवश्यक आहे.या कोरोना चाचणी झालेल्या शिक्षकांना 27 फेब्रुवारी रोजी रूजू राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रॅपिड अँटीजेन टेस्ट ही नकारात्मक आलेल्या व कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेल्या कर्मचा – यांनाच कामावर हजर करुन घेण्याचे सूचित केलेले आहे . प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याकरीता शाळेतील १०० % शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा – यांची कोविड टेस्ट होणे बंधनकारक आहे.