बातम्यामहाराष्ट्र

महापालिका प्रभाग रचना रद्द ;निवडणूका सहा महिने पुढे

मुंबई (वास्तव संघर्ष ॲानलाईन)  : या आधी निवडणुकांसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना रद्द करण्यात आली आहे. तसेच महानगरपालिका आणि झेडपीच्या निवडणूका सहा महिने पुढे जाणार आहे .स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांची रचना तयार करण्याचे अधिकार आणि निवडणुकांचे वेळापत्रक ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारडे देणारे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत सोमवारी (दि.7) रोजी मंजूर करण्यात आले आहे. तयासाठीचे विधेयक आज दोन्ही सभागृहांत कोणतीही चर्चा न करता मंजूर झाले. ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्री छगन भुजबळ  यांनी हे विधेयक मांडले. सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचे  राजकीय आरक्षण रद्द झाल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी होणार की नाही असा प्रश्न अनेकांना पडताना दिसत होता मात्र ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळत नाही तो पर्यंत निवडणुका नको,अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली होती. निवडणूक आयोग सध्या त्यांच्याकडे असलेल्या अधिकाऱामुळे निवडणूक जाहीर करू शकतो.त्यात बदल करून निवडणुकांच्या तारखा ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारला मिळावे यासाठी हे विधेयक मांडण्यात आले आहे.

पुढे बोलताना मंञी छगन भुजबळ म्हणाले, ओबीसी आरक्षणावरून असाच गोंधळ मध्य प्रदेशमध्ये देखील झाला होता.तेथे निवडणूक आयोगाचे अधिकार काढून राज्य सरकारकडे घेण्यात आले. तसेच काहीसे आपण करत आहोत. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांची आज सकाळी आज आम्ही बैठक घेतली. त्यात याला मंजुरी घेण्यात आली. प्रभागरचना आणि आरक्षण यांची माहिती आता शासन गोळा करेल आणि शासन ही माहिती गोळा करून निवडणूक आयोगाकडे दिली जाईल. मग ते निर्णय घेतील. प्रभाग रचनेवर स्थगिती आणली गेली आहे, अशी महत्वाची घोषणा त्यांनी केली.

Share this: