क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

दारूची पार्टी पडली महागात ;पतीने केला प्लॅन रचून खून

पिंपरी (वास्तव संघर्ष) : चिंचवडेनगरमध्ये एकाला धारदार हत्याराने गळ्यावर, छातीवर, पोटावरपाठीवर तसेच हातावर वार करून एकाचा खून करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि.05) रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास चिंचवडेनगर वाल्हेकरवाडी चिंचवड येथे घडली.

ज्ञानदेव श्रिरंग साठे( रा. वृंदावन कॉलनी वाल्हेकरवाडी , चिंचवड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अर्जुन रावत मुलीमणी ( रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास चिंचवडेनगर वाल्हेकरवाडी चिंचवड येथे ज्ञानदेव यांचा खून करण्यात आला आहे. आरोपी अर्जुन याच्या पत्नीचा व मयत ज्ञानदेव या दोघांचे गेले काही महिन्यांपासून अनैतिक संबंध असल्याचे आरोपी अर्जून याला समजल्याने अनेक दिवसांपासून राग मनात धरून ज्ञानदेव यांना जिवे ठार मारण्याचा पुर्व नियोजित कट करुन आरोपीने ज्ञानदेव यांना दारु पिण्याच्या बहाण्याने बोलावुन घेवुन त्याचा खून केला . अशा प्रकारे चिंचवड पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांनी खुनाच्या गुन्हयामध्ये अज्ञात आरोपीची कांही एक माहिती उपलब्ध नसताना केवळ पाच तासाच्या आत उघड नसलेल्या खूनाच्या गुन्हयातील आरोपी अर्जुनला अटक करण्यात आली.

सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर, सहा.पोलीस आयुक्त पिंपरी विभाग. सागर कवडे यांचे मार्गदर्शन व सुचानाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, पोलीस निरिक्षक किशोर पाटील , पोलीस उपनिरीक्षक नामदेव तळवडे, सपोफौज पांडुरंग जगताप , पोहवा , राजु जाधव, पोना सचिन सोनपेटे, मपोना,रुपाली पुरीगोसावी, पोशि , गोविंद डोळे, उमेश मोहिते, उमेश वानखेडे, पंकज भदाणे, अमोल माने, रोहीत पिंजरकर यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे .

Share this: