क्राईम बातम्याबातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक :चार दिवसाच्या बाळांचा गळा आवळून दरीत फेकले

पुणे (वास्तव संघर्ष) : मानवतेला काळीमा फासणारी संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. चार दिवसा आधी जन्मलेल्या बाळाचा गळा आवळून त्याला दरीत टाकून दिले आहे. हे कृत्य एका नराधम बापानेच केले आहे. पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात शनिवारी (दि. 5) रोजी ही घटना घडली आहे.

बाळाची आई मंगल सचिन चव्हाण (वय 27 , रा. गोडांबेवाडी घोटावडे, मुळशी,) यांनी पौंड पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बाळाची आई मंगल यांच्या पतीचे निधन झाले असून त्या पुण्यातील घोटवडे भागात गोडांबेवाडी गावात मजूरीचे काम करतात. पहिल्या पतीपासून त्यांची एक मुलगी आहे. गोडांबेवाडीत मंगल या मजूरीचे काम करत असताना त्यांच्यासोबत काम करणारा त्यांचा चुलत भाऊ सचिन चव्हाण याच्याशी त्यांचे शारीरिक संबंध आले आणि या संबंधातून त्यांना बाळ झाले. अनैतिक संबंधातून जन्मलेले हे बाळ तिच्या कुटुंबाला मान्य नव्हते. मग मंगल हीला गावाकडे जायचे आहे असे म्हणून आरोपीने कट कारस्थान रचले.

मंगल चव्हाण यांना शनिवारी 5 फेब्रुवारी रोजी इंडिका कारने रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अंबडस गावी निघाल्या . त्यांची पहिली मुलगी सारीका आणि नुकतेच जन्मलेले चार दिवसांचे बाळ त्यांच्या सोबत होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची कार ताम्हिणी घाटात असताना मंगल हिचा पती सचिन गंगाराम चव्हाण व त्याचे भाऊ संजय गंगाराम चव्हाण, नितीन गंगाराम चव्हाण, अजित गंगाराम चव्‍हाण हे तिथे पोहोचले. त्यांनी जबरदस्तीने इंडिका कार थांबवली आणि मंगलच्या कुशीतील चार दिवसांच्या बाळाला जबरदस्तीने घेतले. त्यानंतर त्याचा गळा आवळून त्याला दरीत टाकून दिले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. ट्रेकर्सच्या मदतीने बाळाचा शोध सुरू आहे.

Share this: