क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

तरुणाला मारहाण करून कोयत्याने वार;पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चिंचवड (वास्तव संघर्ष) : घरासमोर धावत आलेल्या मित्राची विचारपूस करत असलेल्या तरुणाला मारहाण करून कोयत्याने वार केले. त्यानंतर तरुणाच्या बायकोला खाली पाडून जीवे मारण्याची व बलात्कार करण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 6) रात्री बारा वाजता रामनगर चिंचवड येथे घडली.

प्रवीण  जाधव (वय 28, रा. रामनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नीरज पवार, सुरज मोहिते, ऋषिकेश मोहिते, ज्ञानेश्वर मोहिते, सुरज जाधव उर्फ कलब्या (सर्व रा. रामनगर, चिंचवड) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घराच्या बाहेर उभे असताना त्यांचा मित्र ज्ञानेश्वर हा धावत आला. त्याचे कपडे फाटलेले दिसल्याने फिर्यादी यांनी त्याची विचारपूस केली. त्यावेळी आरोपी तिथे आले. आरोपींनी दहशत निर्माण करून फिर्यादी यांच्यावर कोयत्याने वार केले. फिर्यादी यांच्या बायकोला खाली पाडले. तिला सिमेंटच्या ब्लॉकने मारण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केल्याने आजूबाजूचे लोक सैरावैरा पळू लागले. आरोपी सुरज जाधव याने फिर्यादी यांच्या पत्नीला ‘तू परत मला इकडे दिसलीस तर तुला खल्लास करून टाकीन. नाहीतर तुझा बलात्कार करीन’ अशी धमकी दिली. अधिक तपास पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार पतंगे  करीत आहेत.

Share this: