क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

गांजा ओढने पडले महागात ;दोघांना पिंपरी पोलीसांनी केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) : गोगो पेपरमध्ये गांजा भरुन ओढणा-या दोघांना पिंपरी पोलीसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि.6) रोजी दुपारी एकच्या सुमारास बाबू नायर ग्राऊंडच्या कोपऱ्यातील कठड्यावर घडली आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा पोलीस शिपाई अशोक गारगोटे यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राघवेंद्र बल्लोळी (वय-23, वाघेरे नेस्ट सोसायटी नेहरुनगर , पिंपरी), इरफान सय्यद (वय-30, रा . इनामदार चाळ, वसंतदादा पाटील शाळेजवळ, नेहरुनगर, पिंपरी)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राघवेंद्र आणि आरोपी इरफान यांनी आपल्या कब्जात 8 ग्रॅम गांजा व गांजा ओढण्याचे साहित्य अनधिकृतपणे आणि बेकायदेशिररित्या जवळ बाळगुन गोगो पेपरमध्ये गांजा भरुन त्यातुन येणारा धुर ओढत असताना व सेवन करताना मिळुन आले आहेत. आरोपीवर एन. डीपी. एस ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Share this: