Video

शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार युवराज दाखले यांचे प्रचार गीत सोशल मीडियावर “व्हायरल”

पिंपरी – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून. “अॅटो रिक्षा पुढचं बटण दाबायचं , युवराज दाखले यांना आमदार करायचं ’ हे शिवसेनेचे पिंपरीतील बंडखोर उमेदवार युवराज दाखले यांच्या प्रचारासाठी बनविण्यात आलेले व्हिडिओ गीत सोशल मीडियावर चांगलेच “व्हायरल’ झाले आहे. पिंपरी मतदार संघातील प्रत्येकाच्या ओठांवर हे गीत आहे.

“अॅटो रिक्षा पुढचं बटण दाबायचं , युवराज दाखले यांना आमदार करायचं ’ असे बोल असलेले हे गीत मतदारांच्या मनात रुंजी घालत आहे. या ध्वनीफित गीतात मातंग समाजातील युवराज दाखले सर्वसमाजाला एकञ घेऊन जातानाची चिञफित आहे. निवेदने, मोर्चे आंदोलने, महापुरूषांच्या जयंत्या, गणेशत्सोव, दहिहंडी, दांडीया अशा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने जनमानसात मिसळताना युवराज दाखले दिसतात.

Share this: