पिंपरी विधानसभेत शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार युवराज दाखले यांना वाढता जनादेश
पिंपरी:- विधानसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला असून शेवटच्या क्षणी मतदार राजापर्यंत पोहचावे त्यामुळे पदयात्रा, रॅली,घरभेटीने मतदारसंघ ढवळून निघाला आहे. सर्वाधिक उमेदवार असलेला राखीव मतदारसंघ सध्या इतर मतदार संघापेक्षा अधिक चर्चिला जात आहे.त्या इथल्या आजी माजी सदस्यांच्या कुस्तीमुळे.
मात्र नेहमी दुरंगी लढतीचे चित्र सध्या या मतदार संघात धुसर होत असून शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार युवराज दाखले यांनी सर्वसामान्य कष्टकरी मध्यमवर्गीय लोकांच्या जनआधारावर ही लढाई सोपी ठेवलेली नसल्याचे चित्र सध्या मतदारसंघात पहावयास मिळत आहे.
दाखले यांच्या वाढत्या जन आधारामुळे दुरंगी होणारी लढत आता तिरंगी होऊन युवराज दाखले या मतदार संघाचे चित्र बदलेल अशी भावना सर्वसामान्य कष्टकरी मध्यमवर्गीयांमधून बोलले जात आहे. बहुभाषिक व विविध प्रांतातून आलेल्या कष्टकरी व्यापारी,उद्योजक एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून युवराज दाखले यांच्याकडे वळला असल्याचे त्यांच्या जनसंपर्क व भव्य पदयात्रेतून पहावयास मिळत आहे.
आजी-माजी विद्यमान महाशयांना जनता कंटाळली असून पिंपरी विधानसभेतील अनेक प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत. तर अनेक नागरी समस्या “आ” वासून उभ्या आहेत सक्षम कर्तव्यतत्पर नेतृत्व या मतदारसंघाला आजवर मिळालेले नसल्याने या मतदारसंघाचा व शहराचा गेली एक दशकापासून शुन्य विकास आहे. मातंग समाजाचा आणि चळवळीचा कार्यकर्ता म्हणून जनतेने ही लढाई युवराज दाखले यांच्या रूपाने हाती घेतल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे. उमेदवार जरी 17 असले तरी मतदार संघातील विविध सामाजिक संस्था, संघटना,गणेश मंडळे, मित्र मंडळांनी त्यांना अंतर्गत पाठिंबा दिला आहे. युवराज दाखले फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारसरणीला पुढे घेऊन जातील व त्यांच्या चळवळीचा गाडा पुढे नेतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे .