निगडीतील तरुणीची आर्थिक फसवणूक ;तोतया आर्मी ऑफिसरवर गुन्हा दाखल
पिंपरी (वास्तव संघर्ष) – पिंपरी चिंचवडच्या निगडी परिसरात एका तरूणीची ओएलएक्सवर कारची जाहिरात देऊन आपण आर्मी ऑफिसर असल्याचे भासवून कार घेण्यासाठी फसवणूक केली आहे. संपर्क केलेल्या तरुणींकडून ६५ हजार२०० रुपये घेतले . पैसे घेऊन कार न देता तिची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तोतया आर्मी ऑफिसरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . हा प्रकार बुधवारी ( दि .५ ) रात्री सव्वानऊच्या सुमारास घडला …
हर्षिता सर्जेराव मधाळे ( वय १९ , रा . प्राधिकरण , निगडी ) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार 8133077241 या मोबाईल क्रमांक धारक आणि 918486003931 , 918723822149 या गुगल पे अकाउंट धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपीने त्याची कार विकण्याची जाहिरात ओएलएक्स या ऑनलाईन संकेतस्थळावर दिली . ती जाहिरात पाहून फिर्यादी यांनी जाहिरातीत दिलेल्या 8133077241 या क्रमांकावर संपर्क केला . आरोपीने आपले नाव हर्षित सिंग असून आपण आर्मी ऑफिसर असल्याचे सांगितले . त्याची एम एच 12 / एम आर 8025 ही वेगनआर कार विकायची असल्याचे सांगितले . फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्य पेच्या दोन अकाउंटवर 65 हजार 200 रुपये ट्रान्स्फर करण्यास सांगितले . फिर्यादी यांनी पैसे ऑनलाईन दिले . मात्र , पैसे देऊन फिर्यादी तरुणीला आरोपीने कार दिली नाही . याबाबत आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अधिक तपास निगडी पोलीस करीत आहेत .