बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी विधानसभेत ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या पदयात्रेत हजाराे मतदारांचा सहभाग

पिंपरी :-विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या प्रचारार्थ पिंपरी विधानसभा मतदारसंघात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

या पदयात्रामध्ये मावळ लोकसभा मतदार संघातील खासदार श्रीरंग बारणे, तसेच राज्यसभेचे खासदार अमर साबळे, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक प्रमोद कुटे, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, महिला अध्यक्षा उर्मिला काळभोर, माजी नगरसेवक राजू दुर्गे तसेच, महायुतीचे सर्व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या पदयात्रा दरम्यान मतदारांचा मिळणारा प्रतिसाद अप्रतिम होता. ॲड. गौतम चाबुकस्वार यांना संपूर्ण मतदारसंघात मिळणारा प्रतिसाद हा अप्रतिम स्वरूपाचा असून परत एकदा आमदार पदावर विराजमान होण्याकरीता गौतम चाबुकस्वार यांचे प्रयत्नांना यश येणार असल्याचे यावेळी खासदार आप्पा बारणे यांनी सांगितले. तसेच संपूर्ण मतदारसंघात गौतम चाबुकस्वार यांचे स्वागत होत असून, संपूर्ण मतदारसंघात ठिक-ठिकाणी त्यांना विजयीभव चे आशीर्वाद मिळत आहेत

Share this: