जागतिक बातम्याबातम्या

भारत देशासाठी कायपण; पिता-पुत्राकडून आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारो गिलमन्स पॉईंट वर फडकवला तिरंगा

शिखरावर पोहचणारी पहिलीच पिता-पुत्र जोडी 

नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील सर्वात यशस्वी ऍडव्हेंचर कंपनी 360 एक्सप्लोरर मार्फत आफ्रिकेतील सर्वोच्च शिखराच्या मोहिमेत महाराष्ट्राचे नाशिक येथील 12 वर्षाच्या आरव मंत्री व त्याचे वडील शिवलाल मंत्री यांनी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारोच्या गिलमन्स पॉईंटवर भारताचा तिरंगा फडकवून इतिहास रचला आहे. दिनांक 7 नोव्हेंबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजता या दोघांनी किलीमांजारो गिलमन्स पॉइंटवर पाऊल ठेवले.  

      आफ्रिकेतील टांझानिया  देशातील हे शिखर असून याची उंची समुद्र सपाटी पासून 19,341फूट आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी हे शिखर सर करून त्यावर भारताचे राष्ट्रगीत वाजवून विश्वविक्रम केला होता. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयारी करत असलेले बालगिर्यारोहक आरव मंत्री व त्याचे वडील शिवलाल मंत्री दोघांनी हे शिखर सर केले आहे. शून्याच्या खाली तापमान, गोंगावत वाहणारे वारे, उभी चढण या सर्वांमधून अतिशय काळजीपूर्वक यांनी ही मोहीम पूर्ण केली आहे. या शिखराच्या चढाईसाठी त्यांनी 2 नोव्हेंबर रोजी सुरवात केली होती. आरव हा इयत्ता सातवी मध्ये शिकत असून आई शिवानी मंत्री यांची सर्वात मोठी प्रेरणा आहे असे तो म्हणतो.साहसी पिता-पुत्र सध्या वातावरणात झालेल्या मोठ्या बदलामुळे व वादळामुळे दररोज दुपारनंतर किलीमांजारो शिखरावर अतिशय वेगाने वारे वाहत असून बर्फवृष्टी होत आहे.

सकाळी ऊन व दुपारनंतर वादळ असे भीती निर्माण करणारे वातावरण असून या सर्वाला भेदून आरव व शिवलाल या पितापुत्राने हा पराक्रम करून दाखवला आहे.नाशिकमध्ये 360 एक्सप्लोरर गेल्या 2 वर्षांपासून 360 एक्सप्लोरर मार्फत वेगवेगळ्या साहसी ऍक्टिव्हिटी नाशिककरांसाठी आयोजित केल्या जात आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे हे 360 एक्सप्लोरर मार्फत नाशिकमधून आता अनेक मोहिमा आयोजित करणार आहेत. नेपाळ, आफ्रिकेतील किलीमांजारो, रशियातील एलब्रूस, ऑस्ट्रेलिया तसेच 7 खंडातील मोहिमा नाशिकमधून आयोजित करण्याचा त्यांचा मानस आहे.या मोहिमांमध्ये सहभाही होण्यासाठी 9067045500 /9067035500 वर संपर्क करावा असे आवाहन 360 एक्सप्लोरर मार्फत केले आहे.

आरवची पुढील मोहीम आरव किलीमांजारो नंतर 360 एक्स्प्लोररच्या माध्यमातून युरोप व ऑस्ट्रेलीया खंडातील सर्वोच्च शिखर सर करणार आहे.आरव मंत्री(बालगिर्यारोहक): शेवटच्या चढाईवेळी कमी तापमानात आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थतीत आम्ही ही चढाई पूर्ण केली आहे. भारताचा तिरंगा किलीमांजारो शिखरावर फडकवताना अभिमान वाटला. पुढे युरोप व ऑस्ट्रेलीयामधील सर्वोच्च शिखर सर करावयाचे आहे. *शिवलाल मंत्री(गिर्यारोहक):-आमच्या प्रत्येक पावूलावर एक मोठे साहस होते. आफ्रिकेतील हे शिखर सर करणे माझ्या कुटुंबासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मुलगा आरव चा खूप अभिमान वाटतो. अत्यंत वाईट व बदलत्या वातावरणात आम्ही पोहचू शकलो याचा अभिमान वाटतो आहे.आनंद बनसोडे (एव्हरेस्टवीर, 360 एक्स्प्लोरर) आरव व शिवलाल मंत्री यांनी जे यश संपादन केले आहे त्याचा सर्वाना अभिमान आहे. अतिशय प्रतिकूल वातावरणात त्यांनी जी चढाई केली आहे त्याला कशाची तोड नाही. महाराष्ट्राचे एव्हरेस्ट गुरु सुरेंद्र शेळके सरांचे सततचे मार्गदर्शन यामुळे अनेकांना मार्गदर्शन देऊ शकतो आहे. 360 एक्स्प्लोरर च्या माध्यमातून अनेकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

Share this: