पत्नीने भावाच्या मदतीने पतीचा गळा दाबून केला खून;देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
चिखली (वास्तव संघर्ष) :वारंवार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तीला मानसिक शारीरिक ञास देत असल्याने पत्नीने भावाच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून केला आहे . ही घटना रविवारी (दि.6) रात्री दहा वाजता जाधववस्ती येथे घडली.
लखीचंद प्रभुदयाल शर्मा (वय 40, रा. जाधववस्ती, ता. हवेली) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे.
प्रेमचंद प्रभुदयाल शर्मा (वय 58) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी पत्नी अनिता लखीचंद शर्मा (वय 35), पत्नीचा भाऊ तुकाराम भीमाशंकर नाटेकर (वय 29) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत लखीचंद आणि आरोपी अनिता पती-पत्नी आहेत. लखीचंद हा अनिताच्या चारित्र्यावर संशय घेत असे. दारू पिऊन तिला मारहाण करत असे. या त्रासाला कंटाळून अनिताने तिचा चुलत भाऊ आरोपी तुकाराम याच्यासोबत मिळून लखीचंद यांचा गळा दाबून खून केला.पोलिसांनी तुकाराम याला अटक केली आहे.अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत