शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद ;पिंपरी, चिंचवड आणि भोसरीत शहरातील नेत्यांनी केले बंदसाठी आवाहन
पिंपरी (वास्तव संघर्ष ) :- राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माज़ी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली. पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने शुक्रवारी (दि. २७) रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला पिंपरी चिंचवड शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला .
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी कॅम्प, प्राधिकरण, पिंपळे सौदागर, सांगवी, नेहरूनगर,चिखली, भोसरी, संत तुकाराम नगर आदी भागात स्थानिक कार्यकर्ते व नेत्यांनी परिसरात फिरून व्यापाऱ्यांना दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केला.
पिंपरी-चिंचवड शहराची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी कॅम्प परिसरात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक डब्बू आसवानी, नगरसेविका निकिता कदम आणि हरीश कदम यांनी कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांना “मी साहेबांसोबत…”ची घोषणा देत फेरी काढून व्यापाऱ्यांना बंद पाळण्याची विनंती केली. संत तुकारामनगर, वल्लभनगरमध्ये माजी महापौर योगेश बहल, नगरसेविका सुलक्षणा धर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, प्रवक्ते फजल शेख यांनी तर पिंपळे सौदागर येथे विरोधी पक्षनेते नाना काटे तसेच चिखली येथील साने चौक ते थरमँक्स चौक ते म्हेत्रेवस्ती त्रिवेणीनगर परिसरामध्ये व्यापा-यांनी स्वत:हून कडकडीत बंद केला येथील बाजारपेठेत दुकानदारांना नगरसेवक दत्ताकाका साने यांनी बंदची हाक दिल्याने तीथेही नागरिकांनी व्यापा-यांनी बंदमध्ये सहभाग घेतला.
या बंदमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसनेही हिरारीने सहभाग घेत डांगे चौक, वाकड व परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला, यावेळी विशाल वाकडकर शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिं. चिं. शहर, विशाल काळभोर संघटक राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य, सतीश दरेकर माजी नगरसेवक, गोरक्षनाथ पाषाणकर माजी स्विकृत नगरसेवक, विशाल पवार, फरदीन सय्यद, चिंचवड विधानसभा सरचिटणीस, मयूर थोरवे, चिंचवड विधानसभा संघटक, अब्दुल शेख, भोसरी विधानसभा सरचिटणीस, धनजय जगताप, प्रतीक साळुंखे, निखिल दळवी आदी युवक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते