चिखलीत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट;अवैधरित्या घरगुती सिलेंडर विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
चिखली (वास्तव संघर्ष) :चिखली येथे अवैधरित्या सिलेंडर गॅसचा स्फोट झाला आहे. सुदैवाने येथे कोणतीही जीवितहानी झाली नाही नाही. माञ अवैधरित्या मोठ्या गॅसमधून लहान सिलेंडर मध्ये गॅस भरणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून चार किलो वजनाचे लहान १८ गॅस असे एकुण लहान मोठे २२ गॅस सिलेंडर व गॅस भरण्याकरीता वापरात येणारे एक पितळी नोझल जप्त केली आहे. ही कारवाई गुरूवारी सहाच्या सुमारास उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिस हवालदार राजेद्र भिमराव केदार चिखली पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे.
ललीत दुर्गाराम चौधरी (वय- ४० वर्षे , रा . केशवनगर , नेवाळे वस्ती , चिखली , पुणे) अजय जैन( पुर्ण नाव पत्ता माहीत नाही)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ०३ / ० ९ / २०२० रोजी ६.३० वा . चे सुमारास चौधरी सुपर मार्केट , नेवाळे वस्ती , केशवनगर , चिखली , पुणे आरोपी दोघेजण यांनी भागीदारी करुन अवैध्द / अधिकृत परवाना बेकायदेशीररित्या , घरगुती मोठया सिलेंडर मधुन लहान सिलेंडर मध्ये भरुन नागरी जिवीतास धोका निर्माण होईल या हेतूने जवळ घरगुती वापराचे ३ मोठे भारत गॅस कंपनीचे रिकामे सिलेंडर व १ अर्धा भरलेला सिलेडर व तसेच चार किलो वजनाचे लहान १८ गॅस असे एकुण लहान मोठे २२ गॅस सिलेंडर व गॅस भरण्याकरीता वापरात येणारे एक पितळी नोझल असा एकुण १८,००० / – रुपये किमतीचा माल विक्री तसेच जवळ बाळगत असताना मिळुन आले आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.
वास्तव संघर्षने चार महिन्याअगोदरच स्टिंग ऑपरेशन करून घटना उघडकीस केली होती.
दिनांक २६ जून २०२० रोजी चिखलीत चौधरी सुपर मार्केट , नेवाळे वस्ती , येथे अवैधरित्या घरगुती गॅस सिलिंडर विक्री करणा-या टोळीचा वास्तव संघर्ष ने स्टिंग ऑपरेशन करून पर्दाफाश केला होता. मात्र वेळोवेळी पोलिसांना याबाबत सांगून देखील पोलीस कारवाई करत नव्हते. दरम्यान काल चिखलीतील सामाजिक कार्यकर्ते किशोर तेलंग आणि छावा क्रांतीवीर सेना पिंपरी चिंचवड अध्यक्ष विजय जरे यांनी याठिकाणी गॅस स्पोट झाल्याची माहीती अग्निशमन विभागाला दिल्यावर चिखली पोलीस खडबडून जागे झाले. येथे असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी अवैधरित्या घरगुती गॅस विक्री करणाऱ्या आरोपींवर आज रोजी पोलिसांनी उशीरा गुन्हा दाखल का केला असा प्रश्न नागरिक करीत आहेत.