बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांची अचानक पिंपरी-चिंचवड महापालिकेला भेट

पिंपरी (वास्तव संघर्ष) :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी अचानक पिंपरी-चिंचवड महापालिकेत आज भेट दिली . त्यांनी शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला . पवार यांनी यावेळी महापालिका मुख्यालयातील कोरोना वॉर रुमला भेट देत शहरातील कोरोना रुग्णसंख्या, सर्व्हेक्षण, उपाययोजना आदी परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णसंख्या 50 हजार पार झाली आहे. दररोज एक हजाराच्या पुढे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे.

त्या पार्श्वभूमीवर शरद पवार शहरात दाखल झाले . पालिकेतील कोरोना वॉर रूमला देखील भेट देऊन . शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला

Share this: