फुकटे लोकं
हीच ती चैत्यभूमी आहे…
जिथे ना जाती भेद आहे, ना वर्ण भेद आहे,
ना स्रीभेद आहे…
इथे फक्त आंबेडकरवाद आहे…
पन्नास कोटींपेक्षा जास्त पुस्तकांची खरेदी इथे होत असते…
आणी टिकाटिप्पणी करणारे लोकं म्हणतात
हे फुकटे लोकं आहेत…
इथे एक साधू चाय विकून आपलं पोट भरत असतो..
तर इथे एक भिकारी व्यक्ती कॅलेंडर विकून आपला उदरनिर्वाह पुर्ण करत असतो…
इथे लाखोंच्या पाण्याच्या बिसलेर्या मोफत वाटल्या जातात…
इथे कित्येक कोटीचं खाद्यपदार्थ, जेवण मोफत दिलं जातं….
आणी काही लोकं टिकाटिप्पणी करून म्हणतात हे फुकटे लोकं आहेत…
इथे बिमार व्यक्तींचा ईलाज मोफत केला जातो…
इथे संत्रा, केळी , जांब, सफरचंद असे फळे लाखों लोकांना मोफत दिलं जाते…
आणि काही लोकं टिकाटिप्पणी करून म्हणतात हे फुकटे लोकं आहेत…
याच चैत्यभुमीवर येताना रेल्वेत करोडो रूपयांचा चाय पिला जातो…
हिच ती भूमी आहे ईथे खिचडी, पुरी भाजी, भात वरण, उपमा, पोहे लोखों लोकांना मोफत दिलं जातं…
ईथेच तृतीयपंथी लोकांचा पुस्तकांचा स्टाॅल लागतो…
इथेच गरीब लोकं मायेने बाबासाहेबांचा फोटो असलेले पुस्तके लेकरासाठी खरेदी करतात…
हेच ते ठिकाण आहे
जिथे लोकं बाबासाहेबांना आठवत असतात…
आणि काही लोकं म्हणतात हे फुकटे लोकं आहेत…
इथेच ऐंशी वर्षांची म्हातारी आजी लेकासाठी डोक्यावर पुस्तकांचं ओझ घेऊन चालत असते…
इथेच विचारांचा महासागर उसळतो…
आणी काही लोकं म्हणतात हे फुकटे लोकं आहेत…
हीच ती भूमी आहे
इथे जगातील सगळ्यात जास्त पुस्तक विक्रीची उलाढाल होते…
इथेच मैत्रीचा उगम होतो…
एवढं होऊनही लोकं म्हणतात हे लोकं फुकटे आहेत…
- राजकिशोर ससाणे
नांदेड
9766758243