क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

भाऊ – बहिणीने घरात छापल्या 100 रुपयांच्या 34 नोटा ;बाजारात माल खरेदी करताना भोसरी पोलीसांनी केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी येथील भाऊ – बहिण दोघाजणांनी मिळून घरच्या घरी नकली नोटा छापण्याचा प्रताप केला आहे. सदरील छापलेल्या नोटा खपवण्यासाठी भोसरी येथील भाजी मंडईमध्ये प्रयत्न करताना त्यांचा प्रकार उघडकीस आला . त्यानंतर भोसरी पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून 100 रुपये दराच्या 34 नोटा जप्त केल्या आहेत .

सुनीता प्रदीप रॉय ( वय 22 ) , दत्ता प्रदीप रॉय ( वय 18 , दोघे रा . घोटावडे , पुणे ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत .

याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस शिपाई गणेश पंढरीनाथ सावंत यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी सुनीता आणि दत्ता हे दोघेजण युट्यूबवरील व्हिडीओ पाहून घरातच नकली नोटा तयार करत होते . त्यासाठी त्यांनी प्रिंटर आणि कागद जमा केला होता . 100 रुपये दराच्या नोटा छापण्याचा सपाटा या दोघा भावाबहिणीने लावला होता .

मंगळवारी ( दि . 15 ) दुपारी पाच वाजताच्या सुमारास भोसरी चौकीसमोर असलेल्या भाजी मंडईमध्ये सुनीता आणि दत्ता त्यांनी छापलेल्या नकली नोटा भाजी खरेदी करण्यासाठी वापरत होते . दोघांनी भाजी खरेदी करून त्या नकली नोटा दोघांनी भाजी विक्रेत्याला दिल्या . त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला . गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी सुनीता आणि दत्ता यांना ताब्यात घेतले . त्यांच्याकडे चौकशी करत पोलिसांनी 100 रुपये दराच्या 34 नोटा , दोन एच पी कंपनीचे प्रिंटर , कागदी रिम आणि सुट्टे कागद असा एकूण 34 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . दोघांना पुढील कारवाईसाठी भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे . सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे तपास करीत आहेत .

Share this: