विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी सर्वात प्रथम प्रकाश आंबेडकर
भीमाकोरेगाव – शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर भीमा कोरेगावात दाखल झाले आहेत.प्रकाश आंबेडकर विजयस्तंभास अभिवादन करण्यास सकाळी ७ वाजता पोहचले. आंबेडकरी नेत्यांपैकी सर्वात प्रथम ते प्रथम याठीकाणी आले. ‘आजूबाजूच्या गावातील लोकांनी नेहमीप्रमाणे खूप चांगलं सहकार्य केलं. त्यांचं मनापासून अभिनंदन,’ अशी प्रतिक्रिया आंबेडकर यांनी दिली आहे. दरम्यान, शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव-भीमामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शौर्य दिनाचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजारो अनुयायी कोरेगाव-भीमात दाखल झाले आहेत. चंद्रपुरातून तब्बल ५० दिवस पायी चालत एक पदयात्रा कोरेगाव-भीमामध्ये पोहोचली आहे. बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेले अनेकजण या पदयात्रेत सहभागी झाले आहेत