धारदार शस्त्राने तरुणाचा खून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह कॅनॉलमध्ये टाकला
पुणे – धारदार शस्त्राने तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह कॅनॉल मध्ये टाकल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.३१) सायंकाळी साडेसातच्या दरम्यान पुणे कॅम्प येथील कन्या शाळेच्या पाठीमागे घडल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ज्योती पन्हाळे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्प येथील कन्या शाळेच्या पाठीमागे कोणतरी अज्ञात इसमाने अंदाजे ३० वयाच्या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृणपणे खून केला आहे. एवढेच नाही तर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तरुणाचा मृतदेह कॅनॉलच्या पाण्यात फेकून देण्यात आला होता .याप्रकरणी अज्ञात इस्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लष्कर पोलिस करत आहेत.