क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

संतापजनक: बालाजीनगरमध्ये सापडलेल्या बेवारस बाळाचे कुत्र्यांने खाल्ले हात

भोसरी (वास्तव संघर्ष) : भोसरीतील बालाजीनगरमध्ये आज शुक्रवारी (दि.15) रोजी सकाळी अंदाजे 8 च्या सुमारास मोठ्या नाल्यात बेवारस अवस्थेत एक नवजात बाळ सापडले आहे. हे लहान बाळ पुरूष जातीचे असून त्या मृत बाळाच्या हाताचे लचके कुत्र्यांने तोडले आहेत.

संबंधित माहिती येथे राहणार सामाजिक कार्यकर्ते यांना समजताच त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.सध्या पोलीस बाळाच्या आईचा कसून शोध घेत आहेत.

पिंपरी चिंचवडमधील एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बालाजीनगरमधील एका मोठ्या नाल्यात हे नवजात मुल सापडले आहे. हे बाळ एक दिवसाचे असून या बाळाच्या अंगावर कपडे नव्हते.बाळाला पाहण्यासाठी परिसरात एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी ते बाळ ताब्यात घेतले असून ते बाळ तिथे कोणी सोडले, त्याचे आई-वडिल कोण याचा शोध घेत आहेत.अधिक तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.

Share this: