राजगृहावर भ्याड हल्ल्यांचा छावा स्वराज्य सेना यांच्याकडून निषेध;आरोपींना कठोरातील कठोर शिक्षेची मागणी
पिंपरी (वास्तव संघर्ष) विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह या निवासस्थानावर मंगळवारी रात्री काही समाजकंटकांनी हल्ला करून तोडफोड केल्याच्या घटनेचा निषेध करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी छावा स्वराज्य सेना महाराष्ट्र राज्य वतिने पिंपरी चिंचवड शहर येथील तहसील कार्यालयात निवेदन देऊन केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, संविधान निर्माते महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई दादर स्थित राजगृहावर काही सामाजिक तत्वाच्या समाजघटक लोकांनी दगड फेक, तोडफोड करून विद्रुप करण्याचे कट कारस्थान केले, ही अत्यंत हिंसक अतिशय भ्याड घटना आहे, आणि त्यांनी हे असले अशोभनीय कृत्य केले ते कोण आहेत आणि कोणाच्या सांगण्यावरून केले याचा शोध प्रशासनाने त्वरित करावा आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी या दिशेने तपास करावा. तसेच या ऐतहासिक राजगृहास कायम स्वरूपी पोलीस सुरक्षा तैनात पोलिस संरक्षण प्रदान केल्याबाबत प्रशासनाचेही आभार मानले आहे. यावेळी छावा स्वराज्य सेना महाराष्ट्र राज्य वतिने पिंपरी चिंचवड शहर येतील तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.
यावेळी छावा स्वराज्य सेनेचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सौरभ सगर, महिला शहर अध्यक्षा अॅड सोनाली घाडगे,पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष, विजय बबन माने, शेखर हुंशाल, पिंपरी चिंचवड शहर संपर्क प्रमुख मोरवाडी आय टी आय अध्यक्ष-आशिष पवार, आकाश शिंदे सुरज राउत, शशिकांत कांबळे, निलेश शिर्के, तन्वीर यादव हे उपस्थित होते.