पिंपरी चिंचवडमध्ये “नो हॉर्न संविधान गौरव बाईक रॅली” उत्साहात संपन्न
पिंपरी (वास्तव संघर्ष) :नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त लढा यूथ मूव्हमेंट च्या माध्यामातून अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात “नो हॉर्न संविधान गौरव बाईक रॅली” आयोजित करण्यात आली होती.
भक्ती शक्ति निगडी येथील छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पुतळ्यांस पुष्पहार अर्पण करून बाईक रॅलीला सुरवात करण्यात आली. भारतीय संविधानाचे निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी येथील पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून बाईक रॅलीची सांगता करण्यात आली.
यावेळी भारतीय संविधानाच्या कोनशीलेस अभिवादन करून प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. प्रामुख्याने उपस्थित असणारे राहुल चव्हाण, निखिल पगारे, सुरेश बोचकुरे, आप्पा कांबळे यांना संविधान ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी बुद्धभूषण अहिरे यांनी मनोगत व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले.लढा यूथ मूव्हमेंट चे उपाध्यक्ष भैयासाहेब ठोकळ, समाधान कांबळे आकाश कांबळे, आकाश खरात,संदीप माने,राकेश माने आदींच्या विशेष प्रयत्नातून “नो हॉर्न संविधान गौरव बाईक रॅली” संपन्न झाली.