महाराष्ट्रात लॉकडाऊन पुन्हा परवडणारे नाही-खासदार श्रीरंग बारणे
पिंपरी (वास्तव संघर्ष ) कोविड -19 या जागतिक महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाटी सर्वप्रथम महाराष्ट्रात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाऊन जाहिर केले. त्यानंतर देशभर लॉकडाऊन केले. नुकतेच युरोपातील अनेक राष्ट्रांनी पुन्हा लॉकडाऊन केले आहे. परंतू महाराष्ट्राला आता लॉकडाऊन परवडणारे नाही. त्यासाठी आपण सर्वांनी सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे. मास्कचा वापर करा, सॅनिटायझर वापरा, गर्दित जाण्याचे टाळा असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी दिघी येथे केले.
शिवसेना शाखा दिघी आणि कै. तानाजी सोपानराव वाळके व कै. सुजाता एकनाथ वाळके प्रतिष्ठान व यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 25 डिसेंबर) दिघी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राम गावडे, माथाडी मंडळ सल्लागार समिती सदस्य व कामगार नेते इरफान सय्यद, माजी सरपंच साहेबराव वाळके, माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके, आयोजक संतोष तानाजी वाळके, सारिका संतोष वाळके, पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव आदी उपस्थित होते. सर्व सहभागी रक्तदात्यास हेल्मेट, पाण्याचा जार, हेडफोन भेट या पैकी एक वस्तू भेट देण्यात आली. दिघी शिवसेना आणि वाळके प्रतिष्ठान तसेच लायन्स क्लब ऑफ पुणे डिजिटल व रेड प्लस रक्तपेढीचे सहकार्याने आयोजित केलेल्या या भव्य रक्तदान शिबीरात 603 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
खा. बारणे म्हणाले की, ज्या समाजात आपण लहानाचे मोठे होतो. त्या समाजाचे आपण देणेदार लागतो. या प्रामाणिक भावनेतून अविरतपणे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा संतोष वाळके भगव्या झेंड्याचा शिवसैनिक आहे. राज्यात रक्ताचा तूटवडा निर्माण झाल्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नागरीकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. त्यांचा आदेश शिरसावंद्य मानणा-या संतोषने भव्य रक्तदान शिबीर घेण्याचा संकल्प केला. अध्यात्मिक, वारकरी सांप्रदायाचा वारसा जपणा-या वाळके कुटूंबातील संतोषने गेल्या अनेक वर्षापासून वारीमध्ये वारक-यांची सेवा, अन्नदान, मोफत आरोग्य तपासणी, पांडूरंगाची व माऊलीची सेवा म्हणून मंदीराचे सूशोभिकरण करणे, कोरोना काळात सलग दोन महिने मोफत अन्नदान, रिक्षा चालक व सलून चालक तसेच अनेक गरजूंना मदत केली आहे. कोरोना काळात बाधित रुग्णांना रक्त व प्लाझ्माची गरज आहे. त्यामुळे या शिबीरात संकलीत झालेल्या रक्ताचा गरजूंना उपयोग होईल असेही खा. बारणे म्हणाले.
शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राम गावडे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कृष्णा वाळके, ज्ञानेश्वर वाळके, अशोक वाळके, सुरज लांडगे, किरण गवारे, राहुल गवारे, देविदास मदनकर, निवृत्ती येळवंडे, रामदास परांडे, प्रभाकर कदम, काळुराम वाळके, रमेश वाळके, अशोक वाळके, पोपट शिंदे, अविनाश लोणारे, सागर राणे, नवनाथ परांडे, ऋषिकेश वाळके, बापू परांडे, नितिन परांडे, सुरज वाळके, दत्तात्रय वाळके, सोपान वाळके, ज्ञानेश्वर वाळके, लक्ष्मण तुपे, दत्तात्रय हरिभाऊ वाळके, एकनाथ वाळके, पौर्णिमा एकनाथ वाळके, निलेश कुंभार, प्रशांत निंबाळकर, शुभम वाळके, बंटी वाळके, संतोष घोलप, कैलास कुदळे, निलेश वाळके, गौरव आसरे, योगेश वाळके, राहुल ओवले, संकेत परांडे, खंडू परांडे, पप्पू तुपे, सुरज साठे, बंटी घुले, ईश्वर सवई, सतिश संकपाळ आदी उपस्थित होते.
.