क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

25 टक्के व्याजदराने कर्ज देणाऱ्या पाच आरोपी विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरीतील एका व्यवसायिकाने 25 टक्के व्याजदराने 20 दिवसांसाठी 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या व्यवसायिकाने कर्ज वेळेत परत करु न शकल्याने त्या व्यावसायिकाकडून व्याजासह मुद्दल व वेळोवेळी जबरदस्तीने पैसे उकळले तसेच त्यांना मारहाण केली . या प्रकरणी पाच जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑक्टोबर 2020 ते फेब्रुवारी 2021 रोजी हा प्रकार घडला आहे.

करण मनोज तुलसानी ( वय 20 , रा . साई चौक , पिंपरी ) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विकास किर ( रा.काळेवाडी ) , सचिन सौदे , विजय सौदे ( रा . काळेवाडी ) , विकी भोरे ( रा . रिव्हर रोड , पिंपरी ) , खुपचंद मंगताणी ( रा . वैभव नगर , पिंपरी ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी करण तुलसानी हे होजिअरी व्यावसायिक आहेत . त्यांनी विकास किर याच्याकडून 25 टक्के व्याजदराने 20 दिवसांसाठी 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले . कर्ज वेळेत परत करु न शकल्याने आरोपीने 40 दिवसांचे 80 हजार रुपये वसूल केले तसेच फिर्यादीला शगुन चौक येथे बोलवून धमकी देत मारहाण केली . 50 हजार रुपायांच्या बदल्यात व्याजासह 65 हजार रुपये घेतले आणि वेळोवेळी दुकानात येऊन कधी एक हजार तर कधी दोन हजार रुपये घेतले असे फिर्यादीत म्हटले आहे .अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Share this: