क्राईम बातम्यामहाराष्ट्र

डोंबिवलीत शस्त्रसाठा बाळगणा-या धनंजय कुलकर्णी ला न्यायालयीन कोठडी

 

डोंबिवली (वास्तव संघर्ष ) फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या ४९ वर्षीय भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याला कल्याण गुन्हे शाखेने अटक करत त्यांच्या दुकानातून १७० शस्त्रास्त्रे हस्तगत केली. कल्याण न्यायालयाने मंगळवारी धनंजयला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. धनंजय कुलकर्णी हा भाजपचा डोंबिवली शहराचा उपाध्यक्ष आहे.

मानपाडा रोड परिसरात तपस्या हाऊस ऑफ फॅशन नावाचे धनंजय कुलकर्णी याचे दुकान आहे. या दुकानात मोठ्या प्रमाणात प्राणघातक शस्त्रांचा साठा असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती.  कुलकर्णी याने इतका मोठा शस्त्रसाठा कुठून आणला, तो त्याने कशासाठी बाळगला होता, या शस्त्रांची विक्री केली जाणार होती का, या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. भाजपा शहर उपाध्यक्षाच्या दुकानात शस्त्रसाठा सापडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी  सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास दुकानात धाड टाकली.पोलिंसांनी रात्रभर रात्रभर दुकानाची झडती घेतली त्यात
पोलिसांनी सुमारे १लाख ८६ हजार रुपये किंमतीचा शस्त्रास्त्रांचा साठा हस्तगत केला आहे. त्यात पुढील शस्त्रांचा साठ्याचा समावेश आहे.

६२ स्टील आणि पितळी धातूचे फायटर्स३८ बटन चाकू२५ चॉपर्स१० तलवारी९ कुकऱ्या९ गुप्त्या५ सुरे३ कुऱ्हाडी१ कोयता१ एयरगन१ मोबाइल

Share this: