बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

उत्तर प्रदेशमधील तरुणीचे हत्याकांड प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा ;महिला वकिलांनी व्यक्त केला संताप

पिंपरी (वास्तव संघर्ष) :उत्तर प्रदेश , हाथरस याठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या मनीषा वाल्मिकी नावाच्या 19 वर्षीय तरूणीवर मारहाण करून 19 सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिने याची कुठेही वाच्यता करू नये म्हणून तिची जीभ देखील या नराधमांनी छाटली होती. उपचारादरम्यान दिनांक 29 सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झालेला आहे. या अमानवीय घटनेचा सर्वच स्तरातून निषेध नोंदविला जात आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील महीला वकिलांनी वास्तव संघर्ष ला आपले मत व्यक्त करुन संताप व्यक्त केला आहे. याबाबत अ‍ॅड: सोनाली घाडगे पाटील म्हणाल्या की,

अमानुष कृत्य करणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे तरच  महिलांवर होणाऱ्या अन्यायाला आळा बसेल सदर  प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून चार्ज शीठ कोर्टात पाठवण्यात यावी व फास्ट  ट्रॅक कोर्ट मध्ये  स्पेसिअल पब्लिक प्रोसि   क्यूटर  नेमून मयत मनीषा च्या आई वडिलांना   लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे अजून किती बळी पडतील माहिती नाही घटना जर थांबल्या नाहीत तर मग कायद्याची शिक्षापुरेशी आहे का?? महिला सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. अ‍ॅड: सोनाली घाडगे पाटील (राष्ट्रवादी लीगल सेल सचिव संघटक पुणे शहर) मो न 7385513329

अमानुषपणे बलात्कार करून अत्यंत क्रूर हत्या करणार्या नराधमांना अत्यंत कडक शासन करून पुन्हा अशी गोष्ट करणार्यांवर वचक बसला पाहिजे महिला सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे  देश स्वतंत्र होऊन 73 वर्ष होत आली तरी ही युपी मधील परिस्थिती बदली नसून आरोपींना जबर शिक्षाची मागणी आम्ही वतीने करीत आहोत- अँड.वैशाली शिंगवी मो न 9527289545

दि.१४-०९-२०२०हातगा येथे घडलेल्या सामुहिक बलात्काराची घटना अतिशय निंदनीय असून आशा प्रकारच्या घटना वारंवार घडणारा मागे पुरुषी मनोवृत्ती ही मनुवादी व त्यास साथ देणारे सत्ताधारी
आशा घटनेचा करावा तेवढा निषेध कमी आहे. अ‍ॅड: श्रुती सुभाष संकपाळ (कांबळे)मो न 8308723439

गुन्हा केला तर तो कायद्या च्या  कचाट्यातुन  सुटणार नाहीच, परंतु  जी जनावर वृत्तीची आहे त्यांना कायदा लागू करायचा का? असा  प्रश्न मला खुप वेळा सतावतो… आज  विविध  क्षेत्रात महिला घर सांभाळून स्वतः चे अस्तिव तयार करत आहे, परंतु घाणेरड्या  विकृत  मनोवृत्ती च्या  पुरुषी छ ळ ला त्यांना  बळी पडावे लागत आहे. स्त्री ला लक्ष्मी वर सर स्वती ची उपमा देऊन  पुजण्या  पेक्षा , प्रत्येक महिले मध्ये स्वतः ची मुलगी, बहीण  म्हणून बघा,  तसेच  मयत  मुलीच्या आई वडिल्यांच्या वेदना काय असतील त्याजागी  आपण आहोत याचा विचार केला तर खुप चांगले होईल, कारण मुलगी गमावलेच दुःख त्यांना माहित…बलात्कार करणाऱ्याला  शिवाजी महाराजांच्या  काळातील शिक्षा देऊन भर  रस्त्यात  जाळलं पाहिजे…. तरच असे  कृत्य थांबेन हेच म्हणायची वेळ  आलेली आहे…ऍडव्होकेट व नोटरी कांता बी. गोर्डे/शेजवळ (मा. सेक्रेटरी पि. चि. ऍडव्होकेट बार असोसिएशन ) mob. 9970887343

Share this: