क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

ए,जी इन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्टस प्रा.ली व्यावस्थापकाकडून सफाई कर्माचार्‍यास जिवे मारण्याची धमकी

सफाई कर्माचार्‍याची पोलिस आयुक्तांकडे कारवाईची मागणी

ठेकेदारांकडून कंत्राटी कामगारांची पिळवणूक ; न्याय हक्कासाठी कांमगाना घेऊन संप केल्याचा राग मनात धरून ए,जी इन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्टस प्रा.ली चे व्यावस्थापक तानाजी पवार व त्यांचे मेव्हणे संकेत जगताप यांच्याकडून सफाई कर्माचार्‍यास जिवे मारण्याची धमकी

पिंपरी(वास्तव संघर्ष) : आकुर्डीतील हेडगेवार भवन येथे महापालिकेचे वाहनचालक कंत्राटी कामगारांनी कंत्राटदाराविरूध्द कामगारांनी आपल्याला न्याय व हक्कासाठी काम बंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात राष्ट्रीय सफाई मजदुर कॉग्रेसचे ( इटक ) संघटनेचे सहसचिव गणेश बाळू नागवडे यांच्यासह याकंत्राटीतील सर्व कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन काम बंद आंदोलन केले होते याचा राग मनात धरुन व्यावस्थाक तानाजी पवार यांनी गणेश नागवडे यांना फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली
त्यानंतर नागवडे यांनी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे लेखी तक्रार करून कारवाईची मागणी केली सदर व्यावस्थापका विरूध्द चिखली पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा नोद करण्यात आला आहे,

त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हट्ले आहे की मी गणेश बाळू नागवडे रहणार निगडी मी राष्ट्रीय मजदुर कॉग्रेस( इंटक ) संघटनेचा पिंपरी चिंचवड सह सचिव आहे ए,जी, इन्व्हायरो इंफ्रा प्रोजेक्टस आकुर्डी या कंपनीतील कामगारांचा व वाहनचालकांचा पगार वेळेत मिळत नाही म्हणुन मी माझ्या सभासदांसह दि, १५/०९/२०२० रोजी डॉ, हेगडेवार भवन आकुर्डी पुणे येथे काम बंद आंदोलन केले होते तेव्हा कामगारांचा पगार झाला होता याचा मनात धरून आज दि, ०१/१०/२०२० रोजी दुपारी १२ वाजुन ५४ मिनिटांनी ए,जी, इन्व्हायरो इंफ्रा प्रोजेक्टसचे व्यावस्थापक तानाजी पवार यांनी मोबाईल फोन ९७६३२३५६७९ या नंबरने मला जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे, त्यामुळे माझ्या जिवितास ए,जी, इन्व्हायरो इंफ्रा प्रोजेक्टस व्यावस्थापक तानाजी पवार व त्यांचा मेव्हणा संकेत जगताप या दोघांपासून माझ्या जिवितास धोका आहे, त्यामुळे तानाजी पवार व त्यांचा मेव्हणा संकेत जगताप यांच्यावर कादेशीर कारवाई करण्याची मागणी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे केली आहे.

Share this: