पुण्यात युवा सेनेच्या पदाधिका-यांचा खून ;तीन जणांना पोलिसांनी केली अटक

पुणे (वास्तव संघर्ष) : शिवसेनेचे माजी दिवंगत नगरसेवक विजय मारटकर यांचे सुपूत्र युवा सेनेचे कसबा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी दीपक विजय मारटकर यांच्यावर पाच ते सहा हल्लेखोरांनी कोयता आणि चाकूने खून केला होता .

पहाटे दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. या खुनप्रकरणी आठ जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. यातील तिघांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. यामध्ये एका तरुणीचाही समावेश आहे. ही तरुणीच या खूनची मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पुढे येत आहे.

हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही. रात्री जेवण करून दीपक बाहेर आले. आधीच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. डोळे, डोके, पाठ आणि छातीवर सपासप वार करून हल्लेखोर मोटारसायकल वरून पसार झाले.

सर्व हल्लेखोरांनी मास्क लावला होता. मोटारसायकलवर नंबर प्लेट नव्हती. पोलीस परिसरातील सीसी टीव्ही फूटेज तपासत आहेत. मारटकर यांना उपचारासाठी केईएममध्ये दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

Share this: