क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

भंगारच्या दुकानाला गॅसचा मोठा स्फोट; चार जण जखमी

File Photo

पिंपरी (वास्तव संघर्ष): आकुर्डी गावठाण  येथे आज दि. 19 जानेवारी 2024 शुक्रवारी  सायंकाळी सातच्या सुमारास एका भंगारच्या दुकानाला आग लागली. या आगीत चार जण जखमी झाले आहेत. त्यांना त्वरित वायसीएम मध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

पोपट अडसूळ (वय 50) संतोष चनल (वय 45 ) श्रीकांत कांबळे (वय 32) नरेश चव्हाण (वय 38) अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,अक्षय स्क्रॅप सेंटर या भंगारच्या दुकानाला आज सायंकाळी सातच्या सुमारास आग लागली . यामध्ये मोठ्या प्रमाणात पुठ्ठे, प्लास्टिक स्क्रॅप, परफ्युम बॉडी स्प्रे त्यांचे रिकामे कॅन ,भंगार बॅटरी,घरगुती भंगार प्लास्टिक वस्तू आधी गोष्टी आगीमध्ये जळून खाक झाले आहेत.या भंगारच्या दुकानांमध्ये छोट्याशा पत्राच्या खोलीमध्ये या चार व्यक्ती राहत होत्या .

यावेळी स्वयंपाक करत असताना गॅसची मोठ्या प्रमाणात  गळती झाल्याने त्या गॅसचा मोठा भडका उडाला. हा आवाज एवढा मोठा होता की परिसरात या आवाजामुळे भीतीचे वातावरण पसरले होते. यानंतर त्वरित अग्निशमन दल तेथे दाखल झाले व त्यांनी पाण्याचा फवारा मारत या त्वरित विजवली. यावेळी जखमी व्यक्तींना रिक्षा द्वारे त्वरित वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आले हे कामगिरी करण्यासाठी एकूण 32 अग्निशमन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

Share this: