बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

बातमीचा ईपॅक्ट :अखेर महापालिका गटनेत्यांच्या शिष्टाईने मिळाला महामेट्रोच्या कामगारांना पगार

पिंपरी (वास्तव संघर्ष) – पिंपरी-चिंचवडमधील महामेट्रोतील कामगारांचा पगार गेली सहा महीने दिला जात नव्हता. यासाठी मेट्रोतील कामगारांनी ऐन कामगार दिनानिमित्त(दि. १में२०१९)रोजी मेट्रोच्या कामगारांनी आमरण उपोषण केले. यासंदर्भात वास्तव संघर्ष ने त्याच दिवशी बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गटनेते आणि विरोधीपक्षांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन अखेर कामगारांना वेतन मिळून दिले. त्यानंतर आज दि (३ में) रोजी मेट्रोच्या कामगारांनी आमरण उपोषण मागे घेतले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, पिंपरी ते खडकी महामेट्रोने मेट्रो स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे त्याचे काॅन्ट्रक एचसीसी व अलफरा प्रा. लि. या ठेकेदारीला कंपनीला दिले होते. काही दिवसांपूर्वी या कामगारांनी काम बंद केले होते..

त्यामुळे ऐन कामगार दिनानिमित्त मेट्रोच्या कामगारांनी पिंपरीतील वल्लभनगर येथे ठेकेदारांच्या साईट आॅफिससमोरच आमरण उपोषण केले. यानंतर या कामगारांच्या आमरण उपोषणाला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहूल कलाटे,मनसे गटनेते सचिन चिखले, तळेगाव येथील नगरसेवक अरुण माने आणि माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी पाठिंबा दिला. तसेच कामगारांना पगार देण्याची मागणी केली.

त्यांनी ठेकेदार कंपनीचे अधिकारी अनिल बिराजदार यांच्याशी चर्चा केल्यानंतर अखेर कामगारांना वेतन मिळून दिले. यावेळी ७० कामगारांना तीन महीन्यांचा धनादेश देण्यात आला. त्यानंतर कामगारांनी आमरण उपोषण मागे घेतले.

Share this: