बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील वडगाव शेरी परीसरातील मेट्रोचा पुल कोसळल्याची घटना अफवा ; पोलीस करणार कार्यवाई

पुणे(वास्तव संघर्ष) :पुण्यातील वडगाव शेरी परीसरातील फिनिक्स मॉलजवळ मेट्रोचा पुल कोसळल्याचा फोटो सोमवारी रात्री सोशलमिडीयावर आणि व्हॉट्सअपवर व्हायरल झाला होता. त्यामुळे पुणे करामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते . पोलिसांच्या सखोल तपासणीनंतर ही अफवा असल्याचे निदर्शनास आले . यामुळे ही अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिस प्रशासन कडक कारवाई करणार आहे .

काय आहे प्रकरण?

व्हॉट्सअप या सोशलमिडीयावर सोमवारी रात्री एक मेसेज व फोटो व्हायरल झाला होता . मेसेजेसहीत फोटोत लिहीले होते की, पुण्यातील विमाननगर परिसरातील फिनीक्स मॉल जवळ असलेल्या मेट्रोचा पुल पडला आहे . साहजिकच व्हॉट्सअपवर आलेला फोटो व मेसेजची कुठलीही खातरजमा न करता काही लोकांनी क्षणाचाही विलंब न करता तत्काळ ते फॉरवर्ड करण्यास प्राधान्य दिले .त्यामुळे पुणेकरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

या व्हायरल प्रकरणाची पोलिसांनी तत्काळ दखल घेतली . विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी प्रत्यक्षात पाहणी केली . त्यावेळी असे काहीही घडले नसल्याचे तसेच ती अफवा असल्याचे स्पष्ट झाले

दरम्यान पुल पडल्याची घटना घडली आहे मात्र ही घटना होती हरियाणा राज्यातील गुरुग्राम शहरातील सोहना रोडवरील . तेथील एका पुलाचा स्लैब कोसळल्याचे हरियाणाचे उपमुख्यमंत्री यांनी दिली होती . तेच फोटो पुण्यातील मेट्रोचे असल्याचे भासवुन व्हॉट्सअपवर व्हायरल केले जात होते .

Share this: