बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे कोरोना पॉझिटिव्ह

पिंपरी(वास्तव संघर्ष) – पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीमध्ये खळबळ उडाली आहे. एकिकडे शहरातील अनेक आजी – माजी नगरसेवकांना कोविड १ ९ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत . त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान विरोधी पक्षनेते नाना काटे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे .

पिंपळे सौदागर रहाटणी प्रभागातून नगरसेवक असणारे व विरोधी पक्षनेते नाना काटे यांना कोरोना लागण झाल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . याची माहिती स्वतः नाना काटे यांनी फोनद्वारे दिली आहे . त्यांनी कार्यकर्त्यांना माझी प्रकृती उत्तम आहे . सर्वांनी आपआपली काळजी घ्यावी . वेळीच तपासणी करावी , ‘ असा सल्ला नाना काटे यांनी दिला आहे .

Share this: