पिंपरी चिंचवड शहरात 1 हजार 105 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील आज एक हजार 105 रुग्णांचे तर शहराच्या बाहेरील 37 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 45 हजार 510 झाली आहे.
दिवसभरात महापालिका हद्दीतील 10 आणि हद्दीच्या बाहेरील 1 अशा एकूण 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 727 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 5 हजार 87 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
गुरुवारी 727 जणांना पूर्ण उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजवर एकूण 31 हजार 813 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
गुरुवारी शहरातील 10 रुग्णांचा तर शहराच्या बाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज मृत झालेले रुग्ण निगडी (पुरुष 84 वर्षे), भोसरी (पुरुष 54वर्षे, स्त्री 68वर्षे), पिंपरी (पुरुष 83वर्षे), रावेत (पुरुष 65वर्षे), मोशी (स्त्री 65वर्षे), तळेगाव (पुरुष 56वर्षे), सांगवी (स्त्री 54वर्षे, पुरुष 72वर्षे, पुरुष 79वर्षे),दापोडी (पुरुष 83वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीच्या बाहेरील 37 रुग्णांचे आज निदान झाले. सध्या 728 रुग्णांवर पिंपरी चिंचवड शहरात उपचार सुरू आहेत. बाहेरील 173 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एक हजार 768 जणांनी कोरोनावर मात केली आहे.पिंपरी चिंचवड शहरातील 135 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत