बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

चिंचवड येथील रामनगर परिसरात जलवाहिनी फुटली ; हजारो लिटर पाणी वाया

पिंपरी (वास्तव संघर्ष ): सध्या पिंपरी चिंचवड शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. अशातच पिंपरी चिंचवडमधील रामनगर परिसरात आज मंगळवारी (दि. ३१) रोजी सकाळच्या दरम्यान जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले .यामुळे या परिसरात पाण्याची समस्या उदभू शकते.

सविस्तर वृत्त असे की, मंगळवारी सकाळच्या दरम्यान चिंचवडमधील रामनगर परिसरात सहजीवन कंपनीसमोर जलवाहिनी फुटली. यामुळे आठ ते दहा फूट उंचीपर्यंत पाण्याचे कारंजे उडत होते. जलवाहिनी फुटल्यामुळे रामनगर परिसर जलमय झाला आहे. सकाळी उशिरापर्यंत पाणी वाया जात आहे.

उन्हाळ्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. कोरोना व्हायरसने देशात थैमान घातले आहे या करोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका प्रशासन नागरिकांना वारंवार हात धुण्याचा सल्ला देत आहे. अशा स्थितीत हजारो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

Share this: