क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

वेतन मिळत नसल्याने एच,ए कंपनीच्या कामगारांची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी (वास्तव संघर्ष)पिंपरी येथील हिंदुस्तान अॅन्टीबायोटिक(एच. ए) कंपनीच्या एका कामगाराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गेल्या वीस वर्षांपासून वेतन न झाल्यामुळे घरातील बिगट परिस्थितीला वैतागून ही आत्महत्या केल्याचे समजते. शुक्रवार दि (१)अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे.

 

रामदास शिवाजीराव उकिरडे (वय ५१, राहणार मंगलनगर थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. उकिरडे हे पिंपरी येथील हिंदुस्तान अॅन्टीबायोटिक या कंपनीत लॅबमध्ये काम करत होते. त्यांचे वेतन काही महिन्यापासून रखडले होते त्यामुळे ते नैराश्याच्या गर्तेत होते. कंपनीतून आल्यावर घरी ते वेतन मिळत नाही असे सांगत होते असे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले. संसाराचा गाडा हाकण्यासाठी त्यांच्या पत्नीने ब्युटी पार्लरचे छोटे सुरू केले तीदेखीलतत्यांच्या मनावरचा ताण कमी होत नव्हता त्यामुळे चिंताग्रस्त झालेले उकिरडे यांनी शुक्रवारी घरात एकटे असताना साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान पिंपरीतील एच, ए कंपनी तोट्यात असल्याने ९०० कामगारांचे वेतन वीस महिन्यापासून मिळालेले नाही.

Share this: