बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी ‘ या पुस्तकाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीचे पिंपरीत आंदोलन

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरीतील डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आज के शिवाजी नरेंद्र मोदी ‘ या पुस्तकाविरोधात काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज ( मंगळवारी ) आंदोलन करण्यात आले . यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली . या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी आंदोलकांनी केली .

यावेळी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे , माजी महापौर कविचंद भाट , माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे , शामला सोनवणे , बिंदू तिवारी , बाळासाहेब साळुके , परशुराम गुंजाळ , मयुर जयस्वाल , मकरध्वज यादव , शहाबुद्दीन शेख , चंद्रशेखर जाधव , वसिम इनामदार , दिलीप पांढरकर , तानाजी काटे , लक्ष्मण रूपनर , भाऊसाहेब मुगूटमल , विशाल कसबे , मेहताब इनामदार , हिरामण खवळे , चंद्रशेखर जाधव , बाबा बनसोडे , संदेश बोर्डे , किशोर कळसकर , हिरामण खवळे , विश्वनाथ खंडाळे , दिपक जाधव , वैभव शिंदे , दिनकर भालेकर , वैभव किर्वे , माधव पुरी , बी . आर . वाघमारे , मोहन अडसुळ आदी सहभागी झाले होते .

यावेळी सचिन साठे म्हणाले , महाराजांशी तुलना म्हणजे सूर्याशी तुलना केल्यासारखे आहे . खरा इतिहास दडपून कपोलकल्पित , काल्पनिक इतिहास नवीन पिढीवर लादण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व इतर थोर राष्ट्रपुरुषांच्या नावांचा वापर भाजपा व आरएसएस करीत आहे . भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाजपाच्या व आरएसएसच्या विचारांच्या एकाही व्यक्तींचे काहीही योगदान नाही . त्यांच्या विचारांचे कोणीही राष्ट्रपुरुष स्वातंत्र्य लढ्यात नव्हते . हा इतिहास दुर्लक्षित व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या व थोर राष्ट्रपुरुषांच्या नावांचा वापर स्व :ताची प्रतिमा उंचावण्यासाठी करीत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणे . हे भाजपा व आरएसएसचे धोरण आहे.

Share this: